Join us

Bigg Boss 14: या सीझनमधील दुसऱ्या फायनलिस्टचे नाव आले समोर, एजाज खानला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 17:10 IST

एजाज खान आधीच फायनलला पोहोचला आहे.

'बिग बॉस १४' मध्ये फायनल आठवडा सुरू झाला आहे आणि केवळ 4 स्पर्धक घरात राहतील.  इम्‍युनिटी स्टोन मिळाल्यानंतर एजाज खान आधीच फायनलला पोहोचला आहे, तर आता अभिनव शुक्ला दुसर्‍या फायनलिस्ट ठरल्याची बातमी येते आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनवने 'बोट' टास्कमध्ये पत्नी रुबीना दिलैक तसेच निक्की तांबोळी, जास्मीन भसीन आणि राहुल वैद्य यांना हरवून फिनालेचे तिकिट पक्क केले आहे.  

बिग बॉसच्या घरातील आतल्या बातम्या देणाऱ्या 'द खबरी' ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.  खबरीच्या ट्विटनुसार अभिनव शुक्ला बर्‍याच काळ बोटीतील खुर्चीवर बसून राहिला. टास्क विनर बनण्यासोबतच तो शोचा दुसरा फायनलिस्ट बनला आहे.

सलमान खानच्या घोषणेनुसार, अभिनव शुक्ला फायनलिस्ट होताच आता आणखी दोन स्पर्धकच फिनालेमध्ये एंट्री घेऊ शकतात. घरात आता रुबीना दिलैक, जास्मीन भसीन, राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी यांच्यात स्पर्धा होणार आहे.  या चौघांपैकी केवळ दोन जणांना अंतिम तिकीट मिळणार आहे.  बिग बॉस अजून नवीन टास्क यांना देणार आहेत. पण असे म्हटले जाते आहे की, हे इथेही सीन पलटणार. बिग बॉस गेममध्ये नवीन ट्विस्ट आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बिग बॉस १४