Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला काठीनं झोडलं', अभिनव कोहलीने सांगितले श्वेता तिवारीसोबतच्या भांडणा मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 17:07 IST

श्वेताने एका मुलाखतीत म्हटले होते की ती अभिनवने तिच्यावर हात उचलला.

श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. श्वेताने एका मुलाखतीत म्हटले होते की ती अभिनवने तिच्यावर हात उचलला. यावर अभिनव कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कबूल केले की त्याने श्वेताला एकदा मारहाण केली. तसेच श्वेतानेही त्याला मारहाण केली होती. 

रिपोर्टनुसार, अभिनव एका मुलाखती दरम्यान सांगितलं की गोष्टी नेमक्या कुठून बिगडू लागल्या.  श्वेताची मुलगी पलक म्हणाली ती अभिनवबरोबर राहू शकत नाही. त्यानंतर गोष्टी बिघडल्या आहेत आणि अभिनव म्हणतो की त्याने  ऑक्टोबर 2020 पासून आपल्या मुलाला पाहिले नाही.

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनव म्हणाला की,“ पलकने लेटरमध्ये नमूद केलेले त्या कानाखाली मारण्याशिवाय  मी श्वेतावर कधीच हात उचलला नाही. मी त्या गोष्टीबाबत दोघींची माफी मागितली आहे.  मी तिच्याबरोबर घरगुती हिंसाचार केला हे सिद्ध करण्यासाठी श्वेताने सगळ्या गोष्टी निर्माण केले आहेत, जे खरं नाही. महिलांना मारहाण करणारा मी कधीच नव्हतो.

अभिनव म्हणाला की श्वेताने त्याला काठीने मारले होते. '' 2017मध्ये  जेव्हा आमची भांडण झाली आणि ती माझ्या 3 महिन्यांच्या बाळाला घेऊन विभक्त झाली, तेव्हा मी बाळाला भेटण्याचा प्रयत्न केला. मी इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केला आहे, ज्यात माझ्या डोळ्याखाली काळा डाग दिसत होतो.'' 

टॅग्स :श्वेता तिवारी