Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या मुलाला एकटं सोडून आफ्रिकेत मारतेय मजा', अभिनव कोहलीनं श्वेता तिवारीवर केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:30 IST

अभिनव कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो श्वेता तिवारीवर आरोप करताना दिसतो आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा घटस्फोटीत नवरा अभिनव कोहली यांच्यातील वाद काही संपायचे नाव घेत नाही. दोघेही  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. श्वेताने अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. यावर तिच मला दांड्याने मारायची असा आरोप अभिनवने केला होता. आता पुन्हा एकदा अभिनवने श्वेतावर गंभीर आरोप केले आहेत. माझी मुलं घरात एकटी आहेत आणि ही दक्षिण आफ्रिकेत मजा मारतेय, असा आरोप त्याने केला आहे.

अभिनव कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो श्वेतावरील राग व्यक्त करताना दिसतो आहे. या व्हिडीओत त्याने म्हटले की, “स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदे आहेत. पण आता पुरुषांसाठी देखील अशा कायद्यांची गरज निर्माण झाली आहे. हे कायदे पुरुषांवर होणाऱ्या खोट्या आरोपांपासून त्यांचा बचाव करतील.  

या व्हिडीओत त्याने पुढे म्हटले की, माझा मुलगा रेयांश घरात एकटा आहे. त्याची काळजी घेणारे कोणीच नाही. त्यात ही बाई शोच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेत मजा मस्ती करतेय. अभिनवच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.  सध्या श्वेता आणि अभिनवमधील वाद कोर्टात सुरु आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

श्वेता तिवारीने अभिनवसोबत लग्न करणं हा माझा चुकीचा निर्णय होता. त्यानं माझा मानसिक आणि शारिरिक छळ केला असल्याचे म्हटले आहे. पलकनं लिहिलेल्या एका पत्रातही याचा उल्लेख आहे. मुलांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन मी पतीपासून विभक्त झाले. माझा मुलगा केवळ ४ वर्षांचा आहे अन् त्याला पोलीस आणि कोर्ट म्हणजे काय माहिती आहे, असे श्वेताने सांगितले होते.

टॅग्स :श्वेता तिवारी