Join us

अभिज्ञा भावेने ५ मिनिटांत घटविले ३ किलो वजन?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं फिटनेस सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 19:09 IST

Abhidnya Bhave : सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (abhidnya bhave). गेल्या कित्येक वर्षांपासून अभिज्ञा मराठी सिनेविश्वात सक्रीयपणे कार्यरत आहे. इतकेच नाही तर आता तिने थेट हिंदी मालिका विश्वातही एन्ट्री केली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने तिचे वजन घटवल्याचे सीक्रेट सांगितले आहे.

अभिज्ञा भावे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझे वजन घटविण्याचे सीक्रेट. ५ मिनिटांत ३ किलो वजन कसे घटवायचे.ही जादू अमांडा कार्व्होलोने केली आहे. अभिज्ञाच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. खरे तर अभिज्ञाने शॉर्ट हेअर केले आहे. तिने शॉर्ट हेअर केले आहेत. केस शॉर्ट केल्यामुळे तिचे ५ मिनिटात ३ किलो वजन घटविले आहे. 

अभिज्ञाच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकरने लिहिले की, खूप सुंदर दिसते आहे. सुखदा खांडकेकरने म्हटले की, ओह गॉड. का. शॉर्ट हेअर खूप सुंदर दिसत आहेत पण लांब केसही छान दिसायचे. अनुजा साठेने म्हटले की, हे पाहिल्यानंतर आता मला पण माझे केस कापायचे मन करत आहे. याशिवाय आणखी सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत.   

टॅग्स :अभिज्ञा भावे