Join us
Daily Top 2Weekly Top 5

“Anniversaryच्या दिवशी अभिज्ञाला माझ्या कॅन्सरबद्दल कळलं", अभिनेत्रीच्या नवऱ्याने सांगितला कठीण काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:39 IST

नवऱ्याच्या कॅन्सरबद्दल कळताच अभिज्ञाची झालेली 'अशी' अवस्था

अभिज्ञा भावे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'खुलता कळी खुलेना', 'तू तेव्हा तशी', 'लगोरी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अभिज्ञा घराघरात पोहोचली. मराठीबरोबरच अभिज्ञाने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती बाते कुछ अनकहीं सी या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अभिज्ञाने पती मेहुल पैसह लोकमत फिल्मीच्या 'लव्ह लग्न लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. 

अभिज्ञा आणि मेहुलने या मुलाखतीत एकमेकांचे अनेक सिक्रेटही शेअर केले. त्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही भाष्य केलं. अभिज्ञा आणि मेहुलने २०२१मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला मेहुलला कॅन्सर असल्याचं समजलं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञाने याचा खुलासा केला. ती म्हणाली, "लग्नाचा पहिला वाढदिवस आम्ही चांगला साजरा करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, दुर्देवाने लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला मेहुलला कॅन्सरचं निदान झालं होतं. तरीही माझं असं होतं की आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करुया. या गोष्टीमुळे ही पहिली अॅनिव्हर्सरी लक्षात राहिली. पण, मला एक चांगलं कारणंही हवं होतं. म्हणून मग आम्ही दोन दिवस ताजमध्ये राहिलो होतो. मेहुलची नुकतीच सर्जरी झाली होती त्यामुळे आम्ही जास्त प्रवासही करू शकत नव्हतो." 

पुढे मेहुल म्हणाला, "अॅनिव्हर्सरीच्या दिवशी कॅन्सरबद्दल कळलं होतं. माझ्या हातात जेव्हा रिपोर्ट आले तेव्हाच कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. अॅनिव्हर्सरीचा दुसराच दिवस होता. त्यामुळे मी रिपोर्ट लपवून ठेवले होते.  दोन दिवसांनी अभिज्ञाने ते रिपोर्ट शोधून काढले. आणि रडायला लागली. तिने मला उठवलं आणि मला म्हणाली, तू मला सांगितलं का नाही. तेव्हा मी तिला म्हणालो, जे आहे ते आपण बदलू शकत नाही. जे काय आहे ते डॉक्टर सांगतील. पण, ती भावनिक असल्यामुळे तिला ते सहन झालं नाही." 

टॅग्स :अभिज्ञा भावेकर्करोगसेलिब्रिटी