Join us

Video: उधाणलेला समुद्र अन् नृत्याचा नजराणा; मराठमोळ्या अभिनेत्रीची डान्सच्या माध्यमातून अनोखी कृष्णभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:48 IST

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने समुद्रकिनारी अनोखा डान्स करत श्रीकृष्णाची आराधना केलीय (payal jadhav, gokulashtami)

आज गोकुळाष्टमी. आज देशभरात श्रीकृष्णाची आराधना केली जात आहे. मथुरा, वृंदावन येथे गोकुळाष्टमीच्या उत्साहाला उधाण आले आहे. उद्या दहीहंडीनिमित्त मुंबईतील सर्व गोविंदा पथकं एकावर एक थर रचून दहीहंडीचा उत्सव साजरा आनंदात साजरा करतील यात शंका नाही. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून श्रीकृष्णाची भक्ती करत आहेत. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पायल जाधवने समुद्रकिनारी खास नृत्य करत श्रीकृष्णाची भक्ती गाजवली आहे.

पायलचा समुद्रकिनारी सुंदर डान्स

पायल जाधव सध्या 'अबीर गुलाल' मालिकेत श्रीची भूमिका साकारत आहे. पायलने 'अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरम् । हृदयं मधुरं, गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।।' या गाण्यांच्या ओळींवर पायलने डान्स केलाय. विशेष म्हणजे पायलने समुद्रकिनारी हा सुंदर डान्स केलाय. पायलच्या शास्त्रीय नृत्यातील खास स्टेप करुन श्रीकृष्णाची आराधना केलीय. पायलच्या या डान्सला तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

कोण आहे पायल जाधव?

पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील  लोकप्रिय अभिनेत्री आहे. पायलने 'बापल्योक' या सिनेमात काम केलेलं. पायलवर या सिनेमासाठी विविध पुरस्कारांचा वर्षाव झालाय. पायल 'थ्री ऑफ अस' या बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. पायल सध्या कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' मालिकेत अभिनय करत आहे. पायल नुकतीच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये गेली होती. यावेळी तिने सूरज चव्हाणला भाऊ मानून त्याला राखी बांधली. 

टॅग्स :कलर्स मराठीमराठी अभिनेतादहीहंडी