Join us

️तू माझा नं.1 म्हणत सुयश टिळकच्या बायकोने त्याला रोमाँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 19:57 IST

अभिनेता सुयश टिळक आज आपला 35वा वाढदिवस साजरा करतो आहे. सुयशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने त्याला रोमाँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सुयश टिळक आज आपला 35वा वाढदिवस साजरा करतो आहे. सुयशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने त्याला रोमाँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री आयुषी भावे(Aayushi Bhave)ने सुशय सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघे पाठमोरे उभे दिसतायेत. या दिवसाची मी नेहमीच कृतज्ञ असेन! वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा सुंदर माणूसा, ️तू माझा नं.1 अशा शब्दांत आयुषीने सुयशला शुभेच्छा दिल्या आहेत. यावर सेलिब्रेटीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत. 

सुशय व आयुषीची भेट एका कार्यक्रमात झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पण सुयशने त्याच्या या प्रेमप्रकरणाबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. मात्र योग्य वेळ येताच गोड खुलासा करत त्याने चाहत्यांनाही सरप्राईज दिलं होतं. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

 आयुषी आणि सुयश दोघांनाही दाक्षिणात्य संस्कृती फार आवडते. त्यामुळे त्यांनी याच थीमनुसार साखरपुडा केला होता. यानंतर 21 आॅक्टोबरला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सुशय टिळक हे नाव ‘का रे दुरावा’ या मालिकेनंतर घराघरात पोहोचले.

का रे दुरावा’ या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. नुकताच सुयशचा ‘हॅशटॅग पे्रम’ हा सिनेमा रिलीज झाला.

टॅग्स :सुयश टिळकसेलिब्रिटी