Join us

आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:00 IST

निक्कीला मारल्याने आर्याला घराबाहेर काढण्यात आलं. याविषयी बिग बॉस मराठीच्या बॉसने त्यांचं मत स्पष्ट शब्दात मांडलंय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन घरात प्रचंड गाजलेलं प्रकरण म्हणजे निक्कीने आर्याला मारलेली कानाखाली. या प्रकरणामुळे आर्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं. याविषयी नवशक्ति या मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत केतन माणगावकर यांनी त्यांची बाजू मांडलीय. केतन हे एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड आहेत. केतन म्हणाले, "मेकर्स म्हणून आम्ही खूप त्रयस्थपणे या गोष्टीकडे बघितलं. आज जे स्पर्धक या शोमध्ये आहेत त्यांना आम्हीच कास्ट केलंय. त्यामुळे निक्की आणि आर्या दोघीही आमच्यासाठी समान आहेत."

केतन पुढे म्हणाले, "पण जेव्हा अशी काहीतरी घटना होते तेव्हा माणूस म्हणून त्रास होतो. मेकर्स म्हणून सांगायचं तर हा एक आंतरराष्ट्रीय शो आहे. इंटरनॅशनल शो असल्याने याचे काही नियम आहेत. तुम्ही कोणावर हात नाही उचलू शकत, हा या शोचा मूलभूत नियम आहे. कारण हा शेवटी आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा शो आहे. आपल्यालाही राग येतो कधीकधी, पण त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणाला तरी माराल. त्यामुळे तुम्ही ठरवून कानाखाली माराल, हे चुकीचं आहे. नियमात तिकडे स्पष्ट लिहिलंय आहे की,  कोणावर हिंसा केली तर ती व्यक्ती घराबाहेर जाईल. त्यामुळे आम्हाला नियम पाळणं गरजेचं आहे."

केतन शेवटी म्हणाले, "दुसऱ्या सीझनमध्ये अशी घटना झाली होती तेव्हा आपण पराग कान्हेरेला थेट बाहेर काढलं होतं. आर्याला बाहेर काढायचं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही वेळ घेतला. या टीममध्ये बरेच वरिष्ठ व्यक्ती म्हणजेच केदार शिंदे, प्रथमेश देसाई वगैरे होते. मग आम्ही जे इंटरनॅशनल नियम आहेत ते पुन्हा वाचले. बिग बॉस फॉरमॅटच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. Endemol च्या मॅनेजमेंटसोबत चर्चा  झाली. या सगळ्या चर्चा गृहीत धरुन शांतपणे निर्णय झाला की, नियमानुसार आर्याला घर सोडावं लागेल. सो त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई केली."

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन