Join us

बिग बॉस मराठीमधून 'या' कारणामुळे आरती सोलंकी झाली घराबाहेर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 09:19 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून बराच चर्चेत आहे. बिग बॉस या कार्यक्रमाने मराठी आधी हिंदी, ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून बराच चर्चेत आहे. बिग बॉस या कार्यक्रमाने मराठी आधी हिंदी, तेलगु, कन्नड अशा बऱ्याच भाषांमध्ये आला असून या कार्यक्रमाने बऱ्याच देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. कलर्स मराठी वाहिनीने पहिल्यांदाच बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले. १५ एप्रिलपासून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवसापासून कार्यक्रमास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मेटनुसार कोणी एक सदस्य दर आठवड्याला घरामधून बाहेर जाणार हे निश्चित आणि या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये दर आठवड्याला असते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये होता. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली पण ज्या सदस्याला कमी मत मिळाली त्याला या घरामधून बाहेर पडणे अनिवार्य होते. पहिल्या आठवड्यामध्ये भूषण कडू, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी डेंजर झोनमध्ये गेले आणि कमी मत मिळाली या कारणामुळे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील, पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कमी मतं मिळाल्याने आरती सोलंकी हीला घराबाहेर जावे लागले.   या घरामध्ये टिकायचं असेल तर सयंम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची असते. घरामध्ये हे स्पर्धक कोणाला तितकेसे ओळखत नसल्याने खटके उडणे, भांडण, मतभेद होणे, हे तर होणारच. पण, या सगळ्यावर मात करून तुम्ही कसे पुढे जाता हे महत्वाचे. आरतीचे बिग बॉसच्या घरामध्ये काही चांगले नवे मित्र – मैत्रिणी बनले तर काही बिघडलेली जुनी नाती चांगली झाली. आरतीने या घरामध्ये उषा नाडकर्णी, सई बरोबर बराच चांगला वेळ घालवला. तर मेघा धाडे बरोबर पुन्हा मैत्री देखील झाली. सगळं व्यवस्थित होत असताना तिला हे घर पहिल्या आठवड्यामध्येच सोडून जावे लागले....  आपल्या एलीमेशन बद्दल बोलताना आरती म्हणाली, “बिग बॉसच्या घरामध्ये मी चांगले मित्र कमावले ऋतुजा, उषाजी आणि सई लोकूर... पण, काही जुन्या नात्यांनी साथ दिली नाही याची खंत नक्कीच मनात राहील असे तिने सांगितले. या तीन व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळे स्पर्धक घरामध्ये माईड गेम खेळत आहेत असे मी म्हणेन. या घरामध्ये मी टास्क केले, किचनमध्ये काम केले आणि मनोरंजन देखील केले तरी देखील मला घराबाहेर जावे लागले याचे खूपच वाईट वाटते आहे. घराबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर, मराठमोळ घर आहे”.