Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवरंगी रे! मालिकेत आमीर अली साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 12:29 IST

स्वस्तिक प्रॉडक्शन द्वारे निर्मित नवरंगी रे! ही भारताच्या उत्तर प्रदेशातील एका शहरातील परिसराची (शेजारी) गोष्ट आहे.

ठळक मुद्देया मालिकेत विश्वासचे महत्त्वाचे पात्र आमीर अली साकारतोय.

स्वस्तिक प्रॉडक्शन द्वारे निर्मित नवरंगी रे! ही भारताच्या उत्तर प्रदेशातील एका शहरातील परिसराची (शेजारी) गोष्ट आहे. नवरंगी रे! मध्ये अनेक रंगबेरंगी पात्रे एकाच ठिकाणी आहेत. बोलणाऱ्या भिंती पासून ते श्रीमंत आणि निदर्यी वाया गेलेला मुलगा. एक मूलगामी राक्षस जो जमिनीखाली वाढतोय. समाजजीवनाच्या एका टोकाची एका मिनिटांत हसविणारी ही कथा असून त्यात एकातून दुसरे संकट निर्माण होते. 26 भागांच्या मालिकेचा हिरो आहे विश्वास, ही भूमिका साकारली आहे अभिनेता आमीर अलीने. तो एक धडपडणारा टिव्ही जर्नलिस्ट असतो आणि करियर घडविणाऱ्या ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असतो. एका कथेच्या शोधात, त्याला काहीतरी मोठे सापडते. त्याच्या परिसरात बदल घडवून आणणारा मार्ग! निष्णात अभिनेत्यांचा वापर करून ही मालिका अजूनच मनोरंजक बनवलेली आहे जसे की छेस्पियन अभिनेते सुस्मिता मुखर्जी आणि राजू खेर, तसेच नवीन कलाकारां मध्ये आहेत वैष्णवी धनराज, मनमोहन तिवारी आणि इतर.

आपल्या भूमिके विषयी बोलताना, आमीर अली म्हणाले, “मी यावर्षी नवीन सुरूवात काही केली नाही. नवरंगी रे! ही मालिका  मला खूप जवळची वाटते आहे कारण विश्वासचे पात्र माझ्याशी जुळणारे आहे. तो गंमतीदार आणि खेळकर आहे पण त्याला समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचे वेड आहे.”

सुस्मिता मुखर्जी म्हणाल्या, “मी माझ्या करियर मध्ये अनेक टिव्ही शो मध्ये काम केले आहे, पण ही मला जास्त जवळची वाटते आहे. ही एक फायनाइट मालिका आहे, जी मी याआधी केलेली नाही, याचाच अर्थ असा आहे की थोड्या कालावधी मध्ये आम्हाला आमची पात्रे प्रस्थापित करण्याचे आव्हान घ्यायचे आहे. तसेच हे पात्र स्वतःच नवरंगी आहे.”

टॅग्स :आमिर अलीकलर्स