Join us

आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची रंजक वळणावर, मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:29 IST

आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आता रंजक वळणावर आली आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे मालिकेचे चित्रीकरण गोव्यात सुरू झाले आहे. 5 मेपासून प्रेक्षकांना नवीन भाग पाहायला मिळणार आहेत.  आर्याच्या भक्तीची आणि  काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आता रंजक वळणावर आली आहे. आपल्या भावाला सोडवायला मावळखेडमध्ये आलेली आर्या अमोघशी लग्न करून पाटील घराण्याची सून होते. पाटील घराण्यातील हरवलेल्या आईची, काळुबाईच्या मूर्तीची घरात पुन्हा स्थापना करून पाटील घराण्यातील शांती परत आणण्याचा प्रयत्न ती करते आहे. जो स्वतःला लाख्यासुराची सावली म्हणवतो, तो विराट या प्रवासात तिला विरोध करतो आहे आणि अमोघची पूर्वाश्रमीची प्रेमिका सईदेखील त्यात सामील आहे. या सगळ्यातून आर्या कशी मार्ग काढेल आणि ती काळुबाईच्या मूर्तीपर्यंत पोचेल का, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

लोकप्रिय युवा अभिनेता विवेक सांगळे, रश्मी अनपट, अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे या दमदार कलाकारांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :अलका कुबल