Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील यशच्या वडिलांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 06:00 IST

Abhishek Deshmukh : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी कृतिका देव आणि बहिण अमृता देशमुखदेखील अभिनेत्री आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र आता त्याच्या वडिलांनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुखने साकारली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देव आणि बहिण अमृता देशमुखदेखील अभिनेत्री आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र आता त्याच्या वडिलांनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

अभिषेक आणि अमृताचे बाबा सतीश देशमुख यांना देखील अभिनय क्षेत्राची आवड आहे. हौशी नाटकातून त्यांनी काम केले असल्यामुळे आपली दोन्ही मुलं कला क्षेत्रात आली तरी त्यांची काहीच हरकत नव्हती. आज त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने देखील मालिका चित्रपट क्षेत्रात यश मिळवले आहे. मात्र आता अभिषेकचे वडील सतीश देशमुख यांनी नुकतीच एक जाहिरात करून टीव्ही माध्यमातून एन्ट्री केलेली पाहायला मिळते.

वृद्धांची काळजी घेणाऱ्या YODDA या खाजगी कंपनीच्या जाहिरातीसाठी सतीश देशमुख यांनी काम केले आहे. सदर जाहिरातीचे दिग्दर्शन अनुप देशपांडे यांचे आहे. व्यावसायिक जाहिरातीतला हा पहिला अनुभव सतीश देशमुख यांना भारावून टाकणारा ठरला आहे. आपल्या बाबांची जाहिरात क्षेत्रातील एन्ट्रीवर अभिषेकने त्यांच्या अभिनयाचं कौतुक करणारी स्टोरी लिहिली. हे पाहून अभिषेकच्या बाबांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला अभिनयाची संधी मिळाल्याचे त्यांना खूप समाधान आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका