Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमालच आहे बुवा! 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसले सेटवरून चोरते या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:01 IST

Aai Kuthe Kay Karte: संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. तिच्याबाबतीत एक गजबच माहिती समोर आली आहे.

स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील पात्रांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या मालिकेत संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिने साकारली आहे. तिच्याबाबतीत एक गजबच माहिती समोर आली आहे. 

रुपाली भोसले आई कुठे काय करतेच्या सेटवरून काही गोष्टी चोरत असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा स्वतः रुपाली भोसलेने एका मुलाखतीत केला आहे. आई कुठे काय करते ही मालिका 'समृद्धी' बंगल्यात शुट करण्यात येते. या सेटबाहेर कलाकार आणि स्पॉटबॉय दादांनी चक्क भाजी लावली आहे. सेटबाहेर वांगी, भेंडी, गवती चहा, मेथी, पालक, कांद्याची पात, लाल माठ यासारख्या भाज्या लावल्या आहेत. अनेकदा मालिकेत आपण अरुंधतीच्या किचनमध्ये भाज्या पाहिल्या आहे. अरूंधती भाज्या निवडताना दिसते. या भाज्यांची टरफल फेकून न देता ती पुन्हा मिनी शेतात लावली जातात. आतापर्यंत चवळीच्या शेंगा, गवती चहा यासारखी झाले लावली आहेत. या गोष्टी रुपाली भोसले अनेकदा आपल्या घरी देखील घेऊन गेली आहे. त्यामुळे रुपाली भोसले अरुंधतीच्या किचनमधील भाज्या चोरते आणि तिने हे स्वतः मान्य केले आहे. 

अभिनेत्री रुपाली भोसले हिने हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे. मात्र तिला आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तसेच रुपाली बिग बॉस मराठी या शोमध्येदेखील सहभागी झाली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिका