Join us

'आई कुठे काय करते'मधील रजनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 07:00 IST

आई कुठे काय करते या मालिकेतील रजनी कारखानीस या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आप्पा, आई, अरूंधती, अनिरूद्ध, यश, अभिषेक, इशा आणि संजना या पात्रांना प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या पात्रांशिवाय शेखर, गौरी आणि गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीस यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. रजनीची भूमिका अभिनेत्री सुषमा मुरुडकर साकारते आहे.

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये गौरीची आई रजनी कारखानीसची काही महिन्यांपू्र्वी एन्ट्री झाली. या मालिकेमध्ये ती अनिरुद्धच्या कंपनीची नवीन सीईओची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत गौरी आणि यशच्या साखरपुड्यासाठी रजनी आल्यामुळे सध्या मालिकेत पहायला मिळत आहे. रजनी कारखानीसचे खरं नाव आहे सुषमा मुरुडकर. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मुळची मुंबईची असलेली सुषमा मुरुडकरने आई कुठे काय करते या मालिकांच्या आधी बऱ्याच हिंदी मालिकेत काम केले आहे.  

कुंडली भाग्य, कहा हम कहा तुम, संजीवनी सीजन २, लाल इश्क, ये हे मोहब्बते, कसोटी जिंदगी की, ये हे चाहते अशा अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

ये हे मोहब्बते या मालिकेमध्ये तिने डॉक्टरची भूमिका केली होती.  याशिवाय सध्या ती बायको अशी हव्वी मालिकेत काम करताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सुषमा मुरुडकरची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका