Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती करतेय नवीन शूट, पाहिलात का तिचा नवा लूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:20 IST

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आईची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मधुराणी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मधुराणी प्रभुलकरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, नवीन शूट. मधुराणीने तिच्या नव्या शूटचा नवा लूकही शेअर केला आहे. यात ती खुपच सुंदर दिसते आहे. मात्र ती नेमके कोणत्या प्रोजेक्टचे शूट करते आहे, ते समजू शकले नाही. मात्र तिचा हा नवा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

मधुराणीने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेमुळे मिळाली. मधुराणीला मालिकेत एक मोठी मुलगी असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात तिची मुलगी खूपच छोटी आहे.

मधुराणी सोशल मीडियावर अनेकवेळा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पोस्ट करत असते. ती चित्रीकरणात कितीही व्यग्र असली तरी तिच्या मुलीला, कुटुंबियांना आवर्जून वेळ देते.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका