मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर, रेवती लेले यांच्याबरोबरच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपूर्वा गोरेनेही चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अपूर्वा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अपूर्वा लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली. मात्र तिने नाव आणि चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. त्यामागचं गुपित आता उलगडलं आहे.
अपूर्वाचा होणारा नवरा कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार अपूर्वाच्या होणाऱ्या नवऱ्याचं मराठी सिनेसृष्टीशी कनेक्शन आहे. अपूर्वाचा होणारा नवरा हा लोकप्रिय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे. अभिनेता अंशुमन जोशी याच्यासोबत अपूर्वा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंशुमनला तुम्ही शाळा या सिनेमात पाहिलं असेल. त्याची शाळा सिनेमातील भूमिका प्रचंड गाजली होती.
अपूर्वाने फोटो शेअर करत "आमचं ठरलंय" असं कॅप्शन देत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून अपूर्वाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अपूर्वा आणि अंशुमन लग्न कधी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.
Web Summary : Apurva Gore, known as Isha, is engaged to actor-director Anshuman Joshi. Joshi, recognized for his role in 'Shala,' is now set to marry the 'Aai Kuthe Kay Karte' actress. The couple's impending wedding has sparked excitement among fans.
Web Summary : 'आई कुठे काय करते' में ईशा के रूप में मशहूर अपूर्वा गोरे, अभिनेता-निर्देशक अंशुमन जोशी से सगाई कर रही हैं। 'शाला' में अपनी भूमिका के लिए पहचाने जाने वाले जोशी अब 'आई कुठे काय करते' की अभिनेत्री से शादी करने के लिए तैयार हैं। जोड़े की जल्द ही होने वाली शादी ने प्रशंसकों के बीच उत्साह पैदा कर दिया है।