Join us

आई कुठे काय करते' मालिकेतून ईशा घेणार एक्झिट?, जाणून घ्याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 07:00 IST

अभिषेक, यश, ईशा या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... मात्र ईशा या पात्रात बदल होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

छोट्या प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक मात्राची एक छानशी गोष्ट लेखकानं सांगितली आहे आणि प्रेक्षकांच्या चांगलीच पंसतीस उतरली आहे.... अभिषेक, यश, ईशा या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... मात्र ईशा या पात्र बदल होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण नुकतच ईशाने हिंदीत पदार्पण केल आहे. ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे हिने वागळे की दुनिया या मालिकेत झळकणार आहे... त्यामुळे आता ईशा आता आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झीट घेतेय हा प्रश्न तिला विचारल्यास तिने नकार दिला दोन्ही मालिकेच शुटिंग शड्युल अपूर्वानं व्यवस्थित मॅनेज केल्यामुळे ईशा वागळे की दुनिया आणि आई कुठे काय करते या दोन्ही मालिकेतून आपलं मनोरंजन करणार.

अपूर्वा गोरे 'आई कुठे काय करते' मालिकूत घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते. त्यांनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर अपूर्वाचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.

टॅग्स :स्टार प्रवाह