Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:51 IST

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा साखरपुडा, फोटो झाले व्हायरल

गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. स्वानंदी टिकेकर, मुग्धा वैशंपायन, सोनल पवार यांच्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरू आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. 'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. 

'आई कुठे काय करते'मध्ये यश ही भूमिका साकारून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहोचला. सध्या मालिकेत यश आणि आरोहीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तर आरोहीच्या खऱ्या आयुष्यातही लगीनघाई सुरू आहे. आरोही हे पात्र साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही आरोही नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. 

आरोहीला तिच्या खऱ्या आयुष्यातील यश मिळाला आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. २०२३ वर्षाच्या अखेरीस कौमुदी आणि आकाशने साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. "या वर्षाच्या शेवटी, आम्ही नवीन सुरुवात करत आहोत", असं कॅप्शन देत कौमुदीने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी कौमुदी आणि आकाशला शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेताटिव्ही कलाकार