Join us

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या तुटलेल्या मंगळसूत्रावर आशुतोषनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:42 IST

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या मालिकेचं कथानक अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाभोवती फिरत आहे. अरुंधती आणि आशुतोषचे लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. मात्र त्याआधी अरुंधतीसमोरची विघ्नं काही संपत नाही आहेत. तिच्यासमोर रोज नवनवी आव्हाने समोर येत आहेत. त्यात आता अरुंधतीच्या लग्नातील मंगळसूत्र तुटले आहे. 

मालिकेत पाहायला मिळत आहे की, अनिरुद्धने अरुंधतीचे मंगळसूत्र तोडले आहे आणि तो हे नाकारत असला तरी सगळ्यांचा संशय मात्र त्याच्यावरच आहे. अप्पा आणि अरुंधती तर अनिरुद्धला यावरून बोलतातच पण ईशादेखील आपल्या वडिलांच्या या कृतीने चांगलीच संतापलीय.ती सुद्धा अनिरुद्धला सुनावते.आता नुकतेच मालिकेच्या पुढील भागाची अपडेट समोर आली आहे.

आगामी भागात अरुंधती तुटलेले मंगळसूत्र घेऊन सुलेखा आणि आशुतोषकडे जाणार आहे. अरुंधतीने तुटलेलं मंगळसूत्र दाखवताच आशुतोष आणि सुलेखाला धक्का बसतो. हे नेमके कसे घडले याविषयी त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसते. आता घडलेल्या या प्रकारावर आशुतोष काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका