‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर तर मालिकेची जोरदार चर्चा आहे. संजनाने अगदी साम-दाम-दंड-भेद वापरून देशमुखांच्या घरात प्रवेश मिळवला. पण अनिरूद्ध पुन्हा एकदा अरूंधतीच्या बाजूनं झुकताना दिसतोय. अशात संजना अरूंधतीच्या अपमानाची एकही संधी सोडत नाही. पण अरूंधती इतकी सहनशील व दयाळू की, इतकं करूनही ती संजनाला मदत करते. पण आता कदाचित अरूंधतीचा हा पराकोटीचा चांगुलपणा पाहून प्रेक्षकांनाही कंटाळा आलाये. सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच दिसतंय.
संजना वारंवार अरुंधतीचा अपमान करत असूनही अरुंधती तिची मदत करताना दिसते. अर्थात संजनाचा मूळ स्वभाव बदलत नाही. आता काय तर ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी संजनाचा बॉस तिला कॉम्प्रोमाइज करायला सांगतो. अरुंधती याबाबतीतही संजनाची मदत करण्यासाठी पुढे सरसावते. तुला जी मदत हवी असेल,आम्ही सगळे करू. तू फक्त लढ, अशी म्हणत ती संजनाच्या पाठीशी उभी राहते. पण आता प्रेक्षकांनी यावरून अरूंधतीची खिल्ली उडवली आहे.