Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदेश भावोजींचा मुलगा सोहमची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:03 IST

Soham Bandekar : सोहम बांदेकरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

गुन्हेगारी विश्व आणि त्या गुन्हेगारांच्या पोलीस तपासावर आधारीत असलेली मालिका 'नवे लक्ष्य' कमी कालावधीत लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून सर्वांचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'नवे लक्ष्य' ही सोहमची पहिलीच मालिका आहे. त्याची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरू झाली होती. दरम्यान सोहमने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.   

खरेतर नवे लक्ष्य ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. मालिका संपत असल्यामुळे सोहम खूपच भावुक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चर्चेत आली आहे.

सोहम बांदेकर सोशल मीडियावर सक्रीय आहे. अनेकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. नुकतेच सोहमने नवे लक्ष्य या मालिकेच्या टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने ही मालिका लवकरच संपणार असल्याचे सांगितले आहे. त्याने लिहिले की, 'आज नवे लक्ष्य या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या. जय दीक्षित आणि नवे लक्ष्यवर प्रेम केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.'  सोहम बांदेकर याने स्टार प्रवाह, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर यांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :आदेश बांदेकर