कलर्स मराठीवरील '#लय आवडतेस तू मला' (#Lay Aavdtes Tu Mala Serial) या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो त्याची उत्तमप्रकारे ड्युटी करताना दिसून येत आहे. बॉडीगार्ड असण्यासोबत तो आता सानिकाचा ट्रेनरदेखील आहे. ज्या स्पर्धेसाठी सानिका रनर म्हणून तयारी करतेय त्या स्पर्धेचा ट्रेनर म्हणून सरकारची नेमणूक झाली आहे. त्यामुळे सध्या तो दुहेरी भूमिका बजावत आहे. साहेबरावांच्या घरचं मीठदेखील खाणार नाही, अशी शपथ घेतल्या सरकारने शूटिंगदरम्यानच तब्बल ३० भाकऱ्या बनवल्या आहेत.
सरकारची भूमिका साकारणारा तन्मय म्हणाला,"'#लय आवडतेस तू मला' या मालिकेत सध्या अनेक इंटरेस्टिंग सीन करायला मिळत आहेत. मालिकेत नुकतेच एका सीनदरम्यान माझे कुकिंग कौशल्य वापरायला मिळाले. मालिकेत मी साहेबरावांच्या घरचे मीठदेखील खाणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी त्यांच्या घरातले कुठलेच खाद्य किंवा बनवलेले जेवण जेवत नाही. त्यामुळे मला जसं जमतं तसं मी चुलीवर त्यांच्यात तिथल्या बाहेरच्या जागेत चुलीवर जेवण बनवतोय असा एक सीक्वन्स होता. त्या सीक्वन्ससाठी मला पिठलं भाकरी आणि ठेचा असं सगळं करायचं होतं. त्यावेळी मी तब्बल ३० भाकऱ्या थापल्या आणि शेकल्या".
साधं जेवणच खूप कमाल असतं कारण...
तन्मय पुढे म्हणाला,"पिठलं-भाकरी हे आवडीचं जेवण असून स्वत:बनवून खाण्यात एक वेगळीच मजा आहे ती अनुभवली. मुलांनी स्वत:चं स्वत: जेवण बनवणं आजही समाजात खूप कमी पाहायला मिळतं. सरकारलाही जेवण बनवता येत नसलं तरी तो स्वत:चं पोट भरण्याइतकं जेवण बनवू शकतो. साधं जेवणच खूप कमाल असतं कारण त्या जेवणात कोणाला इंप्रेस करण्यासाठी किंवा पैसे कमवण्याचा विचार नसतो".