Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन झालं बाजींद'मध्ये येणार नवीन वळण, होळीच्या दिवशी राया घटस्फोटाचे पेपर देणार कृष्णाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:26 IST

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मन झालं बाजींद आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मन झालं बाजींद आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि राया कृष्णाला सन्मानाने विधात्यांच्या घरी घेऊन जायचं वचन देतो आणि ते वचन पाळतो सुद्धा. पण आता मालिकेत खूप रंजक वळण येणार आहे. गुरुजींनी सांगितलेल्या भाकीताचा धसका घेऊन राया कृष्णाला घराबाहेर काढणार आहे. 

भाऊसाहेब रायाला रोखून कृष्णाला सगळं खरं सांगायला सांगतात. पण राया काही न बोलता कृष्णाला खेचत मचाणाकडे घेऊन जातो आणि त्याला आग लावतो. तो रागाने कृष्णाला सांगतो आजपासून आपलं नातं संपलं. कृष्णा रडवेली होऊन आपल्या माहेरी येते. कृष्णाला आपल्यापासून दूर कसं ठेवावं हे न कळून शेवटी राया घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतो. होळीच्या दिवशी राया घटस्फोटाचे पेपर कृष्णाला देतो. पण नियतीची खेळी मात्र वेगळीच असल्याने घटस्फोटाचे पेपर होळीमध्ये जळून राख होतात. त्यामुळे होळीच्या निमित्ताने कृष्णा आणि राया यांच्या भरकटलेल्या नात्याची गाडी रुळावर येईल असं दिसतंय. पण  गुरुजीं सांगितलेलं भाकीत खरं ठरणार का? राया आणि कृष्णा एकत्र राहिले तर कृष्णाचा मृत्यू होणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :झी मराठी