Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अनुपमा' मालिकेत अनुपमाच्या आयुष्यात येणार नवे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 20:05 IST

Anupama Serial: 'अनुपमा' या मालिकेच्या कथानकाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून सामाजिक अपेक्षांपेक्षा स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची निवड करणाऱ्या एका महिलेच्या प्रवासाचे सुरेख चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे.

अनुपमा या मालिकेच्या कथानकाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून सामाजिक अपेक्षांपेक्षा स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची निवड करणाऱ्या एका महिलेच्या प्रवासाचे सुरेख चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. पारंपारिक घरात तिने केलेल्या संघर्षांपासून स्वतःचा आवाज शोधण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास आहे. कालांतराने, ही मालिका तिची आव्हाने, त्याग आणि ताकद प्रतिबिंबित करत त्या व्यक्तिरेखेसह विकसित होत गेली आहे. प्रत्येक नवीन टप्प्यासह, ‘अनुपमा’ पुनश्च नव्याने प्रारंभ करण्याचा अर्थ परिभाषित करत राहाते. आता, या मालिकेची कथा तिचा आणखी एक नवा अध्याय उलगडण्यास सज्ज झाली आहे.

‘अनुपमा’ मालिकेचा नवा प्रोमो या कथेत एक महत्त्वपूर्ण बदल सूचित करतो, ज्यामुळे मालिकेच्या कथेतील भावनिक दृष्टिकोनात एक आश्चर्यकारक बदल होत असल्याची जाणीव प्रेक्षकांना होईल. अनुपमा आता मुंबईत आहे, असे शहर जिथे धकाधकीचे जीवन आहे, आणि ती मात्र तिथे ती नि:शब्दतेत मार्गक्रमण करत आहे. लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करताना, ती भावनिकदृष्ट्या तुटलेली दिसते, मागे ठेवून आलेल्या संघर्षांपासून आणि नात्यांपासून जाणूनबुजून तिने तुटलेपण स्वीकारलेले आहे. हे फक्त शारीरिक अंतर नाही, तर तिने मागे वळून पाहण्यास दिलेला शांत नकार आहे. पण या परिस्थितीत एक क्षण तिच्या आत्म्याला हळूवारपणे स्पर्श करतो.

 ती एका नृत्य प्रशिक्षकाला युवतींना प्रशिक्षण देत असताना पाहते आणि तिला तिने तिच्या स्वतःच्या मुलीला नृत्य करायला कसे शिकवले होते, याची आठवण तिला करून देते. तिचे डोळे भरून येतात. त्या क्षणभरात, आपल्याला तिच्या मनाचे घाव भरून येण्याची शक्यता दिसते, कदाचित तिच्या उत्कट आवडीतून, ती हळूहळू मोडून पडलेली गोष्ट पुन्हा निर्माण करू शकेल, असे वाटते. या नव्या शहरात अनुपमाची वाट कोण बघत आहे? ती पुन्हा एकदा स्वतःला शोधू शकेल? तिचा नवा अध्याय ४ जूनपासून रात्री १० वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर उलगडणार आहे.