स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहे. गौरी जयदीपला आपण आई होणार असल्याचं सांगतं. ज्या मानसीला आपण बहीण मानत होते तिने आपल्याला फसवलं असल्याचं सांगते. मात्र जयदीप गौरीसमोर मानसीच्या हाताला kiss करतो आणि गौरीला उंच कड्यावरून ढकलून देतो.जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरी सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झालीय.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नवा ट्विस्ट, शिर्केंच्या घरात येणार गौरीसारखी दिसणारी नवी पाहुणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:01 IST