Join us

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्विस्ट, विरोचकामुळे राजाध्यक्षांवर ओढावणार नवीन संकट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 13:15 IST

Saatvya Mulichi Saatvi Mulagi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेने नुकतेच ५०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Saatvya Mulichi Saatvi Mulagi)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचे कथानक आणि पात्रांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नुकतेच या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसत आहेत. नुकतेच नेत्रा अस्तिकाचा वध करते. दरम्यान आता रुपालीला नवीन शक्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल का, हे पाहावे लागेल.   

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या या आठवड्यात आपण पाहिलं नेत्रा अस्तिकाचा वध करते. रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करते. त्याचवेळेस नेत्रा त्याच चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार करते. रुपाली मेली असे सर्वाना वाटत असतानाच ती उठून बसते आणि विरोचक अमर असल्याचे सर्वांना सांगते. पण रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळतायेत आणि एका वाद्याच्या आवाजाने रुपालीला भंडावून सोडले आहे. त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते जे वाद्य ‘विचित्र वीणा’ आहे. 

विचित्र वीणाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्त येते. या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त झालीय. आता प्राप्त झालेली ही शक्ती राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल ? काय असेल विरोचकाची नवी  चाल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.