Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अंतरपाट' मालिकेत नवं वळण, गौतमीच्या मैत्रीने खुलणार क्षितिजचे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:54 IST

Antarpat Serial : 'अंतरपाट' मालिकेत नुकताच गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' (Antarpat Serial) या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेत नुकताच गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगणार आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या नात्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं फुलणार आहे.

क्षितिजचं गौतमीसोबत लग्न झालेलं असलं तरी त्याच्या मनात अजूनही पूर्वीची प्रेयसी जान्हवीची जागा कायम आहे. जान्हवीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे त्याच्या मनात पक्के आहे. तरीसुद्धा, गौतमीने या नात्यात मैत्रीचे बीज पेरण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच क्षितिजने सत्य सांगितल्यानंतरही गौतमीने धीर सोडलेला नाही.

गौतमी आणि क्षितिजच्या मैत्रीचं नातं त्यांच्या आयुष्यात एक नवा रंग भरणार आहे. गौतमीने क्षितिजला दिलेला हा मैत्रीचा हात त्यांच्या नात्याला एक नवी दिशा देणार आहे. गौतमी आणि क्षितिज लग्नबंधनात अडकल्याने त्यांच्यात पती-पत्नीचं नातं निर्माण झालंय. पण त्यासोबत ते इतर नात्यांतही अडकले आहेत. ही सगळी नाती जपणं गौतमी आपलं कर्तव्य मानते. तिने अत्यंत सकारात्मक पद्धतीने या लग्नाचा स्वीकार केलेला मालिकेत पाहायला मिळेल. 

टॅग्स :कलर्स मराठी