Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या घरी आली नवी पाहुणी, खरेदी केली SUV कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:20 IST

'Maharashtrachi Hasyajatra' fame Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर याच्या घरी नवी पाहुणी दाखल झाली आहे. नुकतीच त्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवी कोरी एसयूव्ही खरेदी केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर याच्या घरी नवी पाहुणी दाखल झाली आहे. नुकतीच त्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवी कोरी एसयूव्ही खरेदी केली आहे. प्रसादने त्याची ड्रीम कार असलेली 'टाटा सफारी' घेतली असून, ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

आपल्या नव्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत प्रसाद खांडेकरने लिहिले, "नवीन फॅमिली मेंबर टाटा सफारी. फायनली टाटा सफारी आयुष्यात आली.. कॉलेजपासून ड्रीम कार होती माझी... मित्रांच्या ड्रीम कार वेगळ्या होत्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पण माझी ठरलेली टाटा सफारी." 

'सफारी' गाडीच्या प्रति असलेल्या आकर्षणाबद्दल बोलताना प्रसादने त्या काळाची आठवण सांगितली. तो म्हणतो, "त्या काळात सगळे सेलिब्रिटी, राजकारणी, व्हीआयपी टाटा सफारी किंवा टाटा सिएरामधून फिरायचे... सफारी रोडवरून जाताना तिचा एक वेगळाच ऑरा असायचा... गाडी घेतल्यावर तो ऑरा फील करतोय... आई, अल्पा, श्लोक आणि मी आम्ही सगळेच भारी खूष आहोत." प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये 'Reclaim your adventure' असा हॅशटॅग वापरत नव्या 'टाटा सफारी'चे कुटुंबात स्वागत केले आहे.

वर्कफ्रंटप्रसाद खांडेकर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. याशिवाय, त्याने 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यात अभिनय करतानाही दिसला होता. तसेच तो 'गाडी नंबर १७६०' आणि 'चिकी चिकी बुबूम बुम' यांसारख्या चित्रपटांतही झळकला आहे. सध्या तो 'थेट तुमच्या घरातून' या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. कॉमेडीसोबतच अभिनय आणि दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवणाऱ्या प्रसादने आपली कॉलेजमधील ड्रीम कार घेऊन एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prasad Khandekar of 'Maharashtrachi Hasyajatra' buys his dream SUV.

Web Summary : Prasad Khandekar, famed from 'Maharashtrachi Hasyajatra,' fulfilled his dream by purchasing a Tata Safari SUV. He shared his long-held aspiration and joy on social media, celebrating the new family member.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा