Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम 'गुरुनाथ' उर्फ अभिजीत खांडकेकरच्या घरी आला नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:30 IST

Abhijeet Khandkekar:अभिजीत खांडकेकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच कालावधी उलटला आहे. आजही मालिका आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या मालिकेत राधिका आणि गुरुनाथ यांची स्टोरी पहिली होती. या मालिकेमध्ये आपल्याला अनिता दातेने राधिकाची भूमिका साकारली होती. तर गुरुनाथ सुभेदारची भूमिका अभिजीत खांडकेकर याने साकारली होती. अभिजीतने मालिकेशिवाय चित्रपटात देखील काम केले आहे. आता लवकरच तो तुझेच गीत गात आहे या मालिकेत दिसणार आहे. अभिजीतच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

अभिजीत खांडकेकर याची पत्नी सुखदा खांडकेकर हीदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका चित्रपटात तिने काम केले आहे. अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. या माध्यमातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच अभिजीतने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्याच्या घरात नवीन पाहुणा आला आहे.

त्याने सोशल मीडियावर मांजरी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, से हॅलो टू स्नो. त्याच्या या फोटोवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनिता दाते, ईशा केसकर मेघना एरंडे या अभिनेत्रींनी या फोटोवर इमोजी शेअर केले आहेत.

टॅग्स :अभिजीत खांडकेकरमाझ्या नवऱ्याची बायको