Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये मोठा ट्विस्ट, आता या प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:39 IST

Sukh Mhanje Nakki Kay Asata : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने ६ वर्षांचा लीप घेतला आहे. लीपनंतर कथानकात बरेच बदल झाले आहेत.

स्टार प्रवाह (Star Pravah)वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेने ६ वर्षांचा लीप घेतला आहे. लीपनंतर कथानकात बरेच बदल झाले आहेत. जयदीप गौरी एकमेकांपासून दुरावले असून या दोघांची लाडकी लेक म्हणजेच लक्ष्मी जयदीपसोबत वेगळ्या शहरात रहात आहे. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत रुही कारखानीस या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही नवी भूमिका साकारण्यासाठी गायत्री खुपच उत्सुक आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. मालिकेतली माझी भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे.

गायत्री दातार पुढे म्हणाली की, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मी एक रिऍलिटी शो केला होता. त्यामुळे गिरीजासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतंच्या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत असल्याची भावना गायत्रीने व्यक्त केली. रुही कारखानीसच्या येण्याने मालिकेत नेमकं काय वळण येणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. 

तुला पाहते रे’ या मालिकेत ईशाच्या भूमिकेतून गायत्री दातार घराघरात पोहचली. तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह