Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेत माय-लेक, ख-या आयुष्यात मात्र एकमेकांना केले डेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:07 IST

छोटा पडदा अफेअर, ब्रेकअप, प्रेम आणि लग्न या सगळ्यामध्ये बॉलिवूडपेक्षा काही कमी नाही. किंबहुना दोन पावलं पुढेच आहे.

ठळक मुद्देबुनियाद या मालिकेत आलोक नाथ यांनी बाबूजीची व्यक्तिरेखा साकारली. या सीरिअलमध्ये नीना गुप्ता यांनी ‘छोटी बहू’ची भूमिका साकारली होती.

छोटा पडदा अफेअर, ब्रेकअप, प्रेम आणि लग्न या सगळ्यामध्ये बॉलिवूडपेक्षा काही कमी नाही. किंबहुना दोन पावलं पुढेच आहे. अनेक टीव्ही स्टार्स मालिकेत त्यांचे आई-वडिल वा सासू-सास-याची भूमिका साकारणा-या को-स्टार्सच्या प्रेमात पडले. अशाच काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हर्षद अरोरा व अपर्णा कुमार

हर्षद अरोरा व अपर्णा कुमार या दोघांनी ‘मायावी मलंग’ या मालिकेत मायलेकाची भूमिका साकारली होती. पण प्रत्यक्षात या मालिकेच्या सेटवर त्यांच्यात प्रेम फुलले होते. हे दोघेही सेटवर एकत्र येत आणि सेटबाहेरही एकत्र दिसते. अर्थात या दोघांनी आपले रोमॅन्टिक रिलेशन कधीच कबुल केले नाही. हर्षद हा माझा केवळ चांगला मित्र आहे, असे अपर्णा सांगितले तर हर्षद यावर कधीच बोलला नाही.

राम कपूर व इवा ग्रोव्हर

इवा ग्रोव्हर हिने ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत राम कपूरच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. पण रिअल लाईफमध्ये राम व इवा एकमेकांच्या प्रेमात होते. यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियात अनेक दिवस चर्चेत होत्या.

सिद्धार्थ शुक्ला व स्मिता बन्सल

सिद्धार्थ शुक्ला व स्मिता बन्सल या कथित कपलबद्दलही असेच. स्मिताने ‘बालिका वधू’ या मालिकेत सिद्धार्थच्या सासूची भूमिका साकारली होती. पण रिअल लाईफमध्ये हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. इतकेच नाही तर दोघांनी दुबईत एकत्र सुट्टी घालवल्याची खबर होती. पण कालांतराने या दोघांचे ब्रेकअप झाले.

अंकित गेरा व मोनिका सिंह

सपने सुहाने लडकपन या मालिकेने घराघरात पोहोचलेला अंकित गेरा नंतर ‘प्रतिज्ञा’ या मालिकेत झळकला. कालांतराने अंकितने नाव याच मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणा-या मोनिका सिंहसोबत जोडले गेले. याचदरम्यान अंकित अन्य एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्याही बातम्या आल्या होत्या.

आलोक नाथ व नीना गुप्ता

बुनियाद या मालिकेत आलोक नाथ यांनी बाबूजीची व्यक्तिरेखा साकारली. या सीरिअलमध्ये नीना गुप्ता यांनी ‘छोटी बहू’ची भूमिका साकारली होती. याच मालिकेदरम्यान आलोक नाथ व नीना गुप्ता यांच्या रोमान्सच्या बातम्या येऊ लागल्यात. पण हे नाते फार काळ टिकले नाहीत आणि दोघेही वेगळे झालेत.

टॅग्स :टेलिव्हिजनआलोकनाथनीना गुप्ताराम कपूर