Join us
Daily Top 2Weekly Top 5

​4 जी गर्ल टीव्ही शोमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 17:48 IST

एका टॉपमोस्ट टेली कम्युनिकेशन ब्रॅन्डच्या जाहिरातून एका रात्रीतून प्रकाशझोतात आलेली ‘4 जी गर्ल ’माहितीयं? होय, तीच ती साशा चेत्री. ...

एका टॉपमोस्ट टेली कम्युनिकेशन ब्रॅन्डच्या जाहिरातून एका रात्रीतून प्रकाशझोतात आलेली ‘4 जी गर्ल ’माहितीयं? होय, तीच ती साशा चेत्री. जाहिरातीनंतर आता साशाची डिमान्ड चांगलीच वाढतीय .यामुळेच आगामी काळात टीव्ही शोमध्ये साशा दिसली तर आश्चर्य वाटायला नको. होय, ‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘4 जी गर्ल ’ होस्ट म्हणून दिसणार असल्याची खबर आहे. या शोचे सेकंड सीझन लवकरच येत आहे. पुनीत पाठक, शक्ती मोहन आणि धर्मेश यादव हे या शोच्या जजिंग पॅनलमध्ये आहे. डान्सर राघव जुयाल हा शोच्या पहिल्या भागात होस्ट होता. दुसºया सीझनमध्येही तोच होस्ट राहणार असून त्याच्या जोडीला साशा चेत्री दिसणार असल्याचे कळते. संबंधित चॅनलने साशाला को-होस्ट होण्यासाठी गळ घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही चर्चा सुुरू आहे. साशाने होकार दिला तर लवकरच ‘4 जी गर्ल ’ रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसणार...