Join us
Daily Top 2Weekly Top 5

'३६ गुणी जोडी' मालिकेत नवं वळण, वेदांत आणि अमूल्याच्या आयुष्यात होणार नवा बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 16:36 IST

'३६ गुणी जोडी' ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.

झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ह्या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे.

 तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. '३६ गुणी जोडी' ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात हि मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. 

आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं कि, अवॉर्ड जिंकल्यावर वेदांत आणि अमूल्या रात्री ऑफिस मध्ये येतात. वेदांत एक ईमेल करण्यासाठी म्हणून ऑफिस मध्ये जातो. त्याच्या पाठोपाठ अमूल्या सुद्धा तिथे पोचते, पण दोघे ऑफिस मध्येच अडकतात. दोघांच्याही घरी काळजी सुरू होते. इकडे ऑफिस मधून बाहेर पडण्याचा वेदान्त आणि अमूल्या प्रयत्न करतायत. पुढच्या भागात हे पाहणं औत्सुक्याचं असेल की खेळात जिंकलेली ही ३६ गुणी जोडी, प्रेमात ही जिंकेल का? ह्या मालिकेने नुकतेच आपले १०० एपिसोड पूर्ण केलेत या निमित्ताने सेटवर सेलीब्रेशन करण्यात  आलं, त्यावेळेस संपूर्ण टीम उत्साहित होती.

टॅग्स :झी मराठी