छोट्या पडद्यावरील एक मालिका सध्या चर्चेत आली आहे. या मालिकेतील काही सीन्समुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. दंगल टीव्हीवर लागणारी 'रिमझिम- छोटी उमर बडा सफर' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असून मालिका बंद करण्याची मागणीही होत आहे. मालिकेतील छोट्या अभिनेत्रीचे ऑनस्क्रीन इंटिमेट सीन्स पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
'रिमझिम' या मालिकेत अभिनेत्री यशिका शर्मा आणि हिमांशू अवस्थी हे मुख्य भूमिकेत आहेत. यशिका अवघी १६ वर्षांची आहे. तर हिमांशू २४ वर्षांचा आहे. 'रिमझिम' मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात यशिका आणि हिमांशू यांचे इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले. १६ वर्षांच्या यशिकाचा रोमान्स पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर मालिकेतील यशिका आणि हिमांशूचे इंटिमेट सीन प्रचंड व्हायरल झाले आहेत. अल्पवयीन असलेल्या यशिकाचे असे ऑनस्क्रीन सीन पाहून प्रेक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
या मालिकेतील इंटिमेट सीन्सची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. अनेकांनी ही मालिका बंद करा असं म्हटलं आहे. "ती फक्त १५ वर्षांची आहे. हे काय चाललंय. तिचे पालक कुठे आहेत?", "या मालिकेलाच बॉयकॉट करा", अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत. याआधीही छोट्या पडद्यावरील इंटिमेट सीन्सवरुन अनेकदा वाद झाले आहेत. काही मालिकांना यामुळे प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागला आहे. आता प्रेक्षकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मालिकेची टीम काय पाऊल उचलते हे पाहावं लागेल.
Web Summary : The series 'Rimjhim- Choti Umar Bada Safar' faces backlash for intimate scenes between a 16-year-old actress and a 24-year-old actor. Viewers are demanding the show's cancellation, citing concerns about the young actress's on-screen romance.
Web Summary : 'रिमझिम- छोटी उमर बड़ा सफर' में 16 वर्षीय अभिनेत्री और 24 वर्षीय अभिनेता के बीच अंतरंग दृश्यों पर विवाद। दर्शकों ने शो को रद्द करने की मांग की, नाबालिग अभिनेत्री के रोमांस पर चिंता जताई।