Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं नातं खूप घट्ट आहे पण...' संजय जाधवसोबतच्या अफेअरवर तेजस्विनी पंडितचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 11:14 IST

मध्यंतरी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

Tejaswini Pandit : मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. नुकतीच तिने निर्मित केलेली 'अथांग' ही वेब सिरीज 'प्लॅनेट मराठी' या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली. आता तिचीच निर्मिती असलेला 'बांबू' हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. याच्याच प्रमोशनसाठी तेजस्विनीने प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने संजय जाधव यांच्यासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच खुलासा केला.

मध्यंतरी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता तेजस्विनीने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. प्लॅनेट मराठीच्या शो मध्ये तेजस्विनीला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्याबाबत पसरलेली सर्वात चांगली आणि सर्वात वाईट अफवा कोणती ?'

यावर ती म्हणाली, 'माझं आणि संजयचं अफेअर आहे ही माझ्याबद्दल पसरवण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात वाईट अफवा आहे. संजयला मी दादा म्हणते. आमच्या दोघांचं नातं घट्ट आहे. तो मला त्याची मुलगी द्वितीसारखं मानतो. तशीच वागणूक देतो. आमच्याबद्दल अशी अफवा पसरवणं हे अत्यंत वाईट होतं. 

तेजस्विनीने संजय जाधव यांच्या 'तू हि रे' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचीही मुख्य भूमिका होती. सध्या तेजस्विनी निर्माती म्हणून नशीब आजमवत आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतातेजस्विनी पंडितसंजय जाधव