Join us

एकता कपूच्या शोला तेजस्वी प्रकाश करणार रामराम?, एका एपिसोडसाठी चार्ज करतेय लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:45 IST

एकता कपूरच्या शोमध्ये काम करण्यासाठी तेजस्वी प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तेजस्वीचाही समावेश आहे.

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लवकरच एकता कपूरच्या सुपरनॅचरल शो 'नागिन 6'ला रामराम करणार आहे. होय, ही अभिनेत्री आता या लोकप्रिय टीव्ही शोचा भाग नसल्याची बातमी आहे. मात्र, अद्याप एकता कपूर किंवा वाहिनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'नागिन 6' या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये बंद होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. अभिनेत्री एका एपिसोडसाठी दोन लाख रुपये घेते. टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तेजस्वीचाही समावेश आहे. हा शो गेल्या वर्षी सुरु झाला होता.

शोमधील तेजस्वीचा अभिनय लोकांच्या पसंती उतरला आहे. यासोबतच 'नागिन 6' टीआरपीच्या बाबतीतही मागे नाही. त्याच्या दमदार स्टोरी लाइनमुळे शोची टीआरपीही चांगली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत शोचा टीआरपी कमी होत असल्याने निर्मात्यांनी आता शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकता 'नागिन 6' नंतर लवकरच 'नागिन 7' या शोचा नवा सीझन घेऊन येणार आहे, ज्यासाठी तिने टीव्हीचा सुप्रसिद्ध अभिनेता गुलतेशामला मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी कास्ट केले आहे. 

टॅग्स :तेजस्वी प्रकाशएकता कपूर