Join us

तारक मेहता...फेम बबीताजीने खरेदी केलं नवं आलिशान घर, फोटो झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:50 IST

Munmun Dutta : मुनमुनने घराच्या आत काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केला. यात ती मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने नुकतंच एक नवं घर खरेदी केलं आहे. तिचं या नव्या घरातील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या लोकप्रिय मालिकेत मुनमुन दत्ता ही बबीताजीची भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी तिने एक रॉयल घर खरेदी केलं, या सुंदर घराचे फोटो बघून कदाचित जेठालाल यालाही ईर्ष्या वाटेल.

मुनमुनने घराच्या आत काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केला. यात ती मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे. मुनमुन दत्ता दिवाळीला या घरात शिफ्ट झाली. या फोटोशूटमधील अभिनेत्रीच्या लूकचं तिचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान गेल्या काही आठवड्यात मालिकेतील ट्रॅकमध्ये मोठा बदल बघायला मिळाला. अनेक कलाकार मालिका सोडून गेला आणि अशात घनश्याम नायक या अभिनेत्याच्या निधनामुळे मेकर्सना धक्का मिळाला. ते मालिकेतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते. घनश्याम नायक यांनी मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारली होती. 

मुनमुन दत्ता (Munmun Dutta) बाबत सांगायचं तर इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या घराच्या बाल्कनीत ट्रेडिशनल लूकसोबत फोटोज पोस्ट केलेत. मुनमुन दत्ताचं हे नवं घर फारच सुंदर आणि शानदार दिसत आहे. मुनमुन दत्ता बऱ्याच वर्षापासून  'तारक मेहता...' या मालिकेत काम करत आहे.  

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा