Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे तैमुर आणि कोरोना व्हायरसचा संबंध, या कारणामुळे रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 16:53 IST

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देतैमुर आणि सैफ अली खानला पाहाताच फोटोग्राफर्स फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यावर कोरोना व्हायसने थैमान घातलेले असताना पण तुम्ही असे कसे वागू शकतात... असे तैमुरची नॅनी फोटोग्राफर्सना सुनावताना दिसत आहे.

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लेक तैमुर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या जन्मापासूनच बॉलिवुड आणि मीडियामध्ये त्याची चर्चा असते. तैमुरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. तैमुरची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नेहमीच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सरसावलेले असतात.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. अनेक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पण तरीही तैमुरचा फोटो काढण्यासाठी काही फोटोग्राफर नुकतेच त्याच्या घराच्या येथे गेले होते. पण या फोटोग्राफर्सना तैमुरच्या नॅनीने चांगलेच सुनावले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तैमुर आणि सैफ अली खानला पाहाताच फोटोग्राफर्स फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यावर कोरोना व्हायसने थैमान घातलेले असताना पण तुम्ही असे कसे वागू शकतात... असे तैमुरची नॅनी फोटोग्राफर्सना सुनावताना दिसत आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खानचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा करिना आणि सैफ कधीच करत नाहीत. 

टॅग्स :तैमुरसैफ अली खान