Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या बाल्कनीत झोपाळ्यावर खेळताना दिसला तैमूर अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 21:34 IST

तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याची छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. सध्याही तैमूरचे असेच काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तैमूर घराच्या बाल्कनीतील झोपाळ्यावर बसून मनसोक्त झुलताना दिसतोय.

गत १५ जूनला तैमूर मॉम-डॅडसोबत लंडनवरून परतला. त्यापूर्वी १५ दिवस तैमूरने मॉम-डॅडसोबत लंडनमध्ये होता. गेल्या अनेक महिन्यांपासून बिझी असल्याने करिना व सैफ दोघेही तैमूरसोबत हवा तसा वेळ घालवू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी लंडन हॉलिडेचा प्लान बनवला होता. 

यादरम्यानचे तैमूरचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. तैमूरच्या संगोपनात बिझी असलेल्या करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला होता. चार मुली आणि त्यांच्या मैत्रीवर आधारित या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर ८० कोटींवर कमाई केली होती. सैफचे म्हणाल तर त्याची ‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफ्लिक्स ओरिजनलवरची वेबसीरिज प्रचंड गाजतेय. लवकरच तो ‘हंटर’ या चित्रपटात नागा साधुच्या भूमिकेत दिसेल.

 

टॅग्स :तैमुर