Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमूर अली खानकडे पाहून ब-याचजणांना होतो या गोष्टीचा भास, तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 12:22 IST

काहींना तैमूर त्याच्या वडिलांची म्हणजेच छोटे नवाब सैफची छबी असल्यासारखं वाटेल.

बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. करीना कपूरचा वंडरबॉय असलेल्या तैमूरमध्ये कपूर घराण्याचे काही ना काही अनुवांशिक अंश असणारच. त्यामुळे कपूर घराण्यापैकी कुणासारखा तरी तैमूर दिसतो असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकच आहे. 

कुणी म्हणतं की तैमूर त्याचे आजोबा रणधीर कपूर यांच्यासारखा दिसतो तर कुणाला बिल्कुल तसं वाटणार नाही. काहींना तैमूर त्याच्या वडिलांची म्हणजेच छोटे नवाब सैफची छबी असल्यासारखं वाटेल. आता नेमका तैमूर कुणासारखा दिसतो हे ठरवण्यासाठी तुम्हाला आणखी काही काळ लागेल. मात्र आता तैमूरचे असे काही फोटो समोर आलेत की तुम्ही त्याची कपूर घराण्यातील एका बड्या व्यक्तीशी तुलना केल्याशिवाय राहूच शकत नाही. या फोटोतील तैमूरचा लूक तुम्हाला मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर यांच्याशी मिळताजुळता आहे. मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर आणि तैमूरचे नवे फोटो यांत कमालीचे साम्य आहे.

 तेच करडे डोळे, हेअरस्टाईल काहीशी तशीच आणि अगदी ऋषी कपूर यांच्यासारखं तसंच स्मितहास्य… सारं काही पाहून तुम्हालाही तैमूर आणि मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर यांच्यात साम्य दिसून येईल. तैमूरचे हे फोटो तुम्हाला ४८ वर्षे मागे घेऊन जातीलल आणि रुपेरी पडद्यावरील मेरा नाम जोकरमधील तो कोवळा ऋषी कपूर आठवल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :तैमुरऋषी कपूर