Join us

"माझ्या आयुष्यातला महत्वाचा सिनेमा.."; तब्बूचं मराठी ऐकलंत का? सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करुन दिली दाद

By देवेंद्र जाधव | Updated: July 11, 2025 17:27 IST

तब्बूने एका सोहळ्यात मराठी बोलून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ पाहताच तुम्हीही चकीत व्हाल

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२५ काल रात्री पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने हजेरी लावली होती. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मराठी २०२५ मध्ये यावेळी तब्बूच्या उपस्थितीने सोहळ्याला चार चाँद लागले. तब्बू पारंपरिक साडी नेसून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधलंच, याशिवाय सर्वांशी मराठीत संवाद साधला. तब्बूचं मराठी ऐकून सर्वांनी तिला दाद दिली. याशिवाय तब्बू महेश मांजरेकरांना मिठी मारत भावुक झालेली दिसली.

तब्बूच्या मराठी बोलण्याचं कौतुक

तब्बूने फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मराठी २०२५ सोहळ्यात ग्लॅमरस पांढरी साडी नेसून हजेरी लावली. यावेळी तब्बूने माईक हातात घेतला. ती म्हणाली, "नमस्कार. मी खूश आहे. तुमचे खूप खूप आभार या सन्मानासाठी. आणि मी हा अॅवॉर्ड एका अशा दिग्दर्शकाला देते आहे ज्यांनी मला माझ्या आयुष्यातला महत्वाचा सिनेमा दिला आणि महत्वाची भूमिका दिली." असं म्हणत तब्बू "मांजरेकर sss" अशी हाक मारते. पुढे महेश मांजरेकर स्टेजवर येतात. तब्बू त्यांना मिठी मारते आणि भावुक होते. पुढे तब्बूने महेश मांजरेकर यांना जुनं फर्निचर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार दिला.

अशाप्रकारे तब्बूने मराठी बोलून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तब्बूने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थिती लावल्याने सर्वांनी तिचं कौतुक केलं. तब्बू यानिमित्त पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्याला गेली होती. फिल्मफेअरने १० व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी सह, सिनेमा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्याची आपली परंपरा दशकापर्यंत यशस्वीपणे पुढे नेली आहे. हा १० वा पुरस्कार सोहळा, १० जुलै २०२५ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे पार पडला. या सोहळ्याला मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

टॅग्स :तब्बूबॉलिवूडमराठी अभिनेता