आमिर खानच्या 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) या चित्रपटात मिस्टर परफेक्शनिस्ट असूनही एका लहान मुलाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. निरागस चेहरा, समोरचे दोन मोठे दात आणि निरागस हास्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. हा बालकलाकार म्हणजे ईशान अवस्थीची भूमिका साकारणारा दर्शील सफारी (Darsheel Safary). इतक्या वर्षांनंतर आता ईशान अवस्थी म्हणजेच दर्शील सफारी खूप मोठा झाला आहे. वयानुसार त्याचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. दर्शील सफारी आता कसा दिसतोय माहीत आहे का?
२००७ साली जेव्हा तारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा दर्शील सफारी जवळपास दहा वर्षांचा असेल. चित्रपटात दिसणारा हा निरागस बालक आता खूप वेगळा दिसतो. खरेतर आता तो खूप हॅण्डसम दिसतो. त्याला आता ओळखणं कठीण झाले आहे.
अद्याप मिळाला नाही मोठा ब्रेकपहिल्याच सिनेमात आपल्या अभिनयाने प्रभावित करणारा आणि चांगला लूक असूनही दर्शील सफारीला चांगला मोठा ब्रेक मिळू शकला नाही. दर्शील सफारीला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यानंतर तो झलक दिखला जामध्ये दिसला. तो कॉमेडी नाइट्स बचाओमध्येही झळकला होता. तसेच बटरफ्लाय नावाच्या शोमध्येही पाहायला मिळाला होता. २०१७ मध्ये दर्शील सफारीने क्विकीमध्येही मुख्य भूमिका साकारली होती. पण नायक म्हणून त्याचे पदार्पण फ्लॉप झाले. तेव्हापासून तो अनेक संधींच्या प्रतीक्षेत होता. याशिवाय तो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना अपडेट देताना दिसतो.