Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कोणी काहीही म्हणो, मला आई व्हायचं नाही" 'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्तानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:33 IST

मुनमुन दत्ताला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मुनमुन दत्ता आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मात्र, पडद्यावरची ही लाडकी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार आणि संसाराला सुरुवात करणार, याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुनमुनने तिला आई होण्याची इच्छा नसल्याचं सांगितलंय. 

रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनमुनला मातृत्वाबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना मुनमुन म्हणाली, "मला आई व्हायचं नाहीये आणि या बाबतीत माझे विचार अगदी स्पष्ट आहेत. कोणी माझ्याबद्दल काहीही बोललं, तरी मला त्याचा काहीच फरक पडत नाही. आई व्हायचे की नाही, हा पूर्णपणे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी माझा निर्णय घेतला आहे".

मुनमुनने पुढे असंही स्पष्ट केलं की, समाज काय विचार करेल किंवा लोक काय टोमणे मारतील, याची ती चिंता करत नाही. ती म्हणाली, "हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. माझं हे मत कदाचित अनेकांना पटणार नाही, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे".

मुनमुन दत्ता हिने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' साकारलेली 'बबिता अय्यर' ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली आहे की, आजही अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा 'बबिता' म्हणूनच ओळखतात. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Munmun Dutta: 'I don't want to be a mother,' declares actress.

Web Summary : Munmun Dutta, famed for 'Taarak Mehta,' stated she doesn't want to be a mother. She values her decision, unaffected by societal pressures or judgments. For her, it's a personal choice.
टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा