Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG दयाच्या कमबॅकआधीच तारक मेहता का उल्टा चष्मामधील या अभिनेत्रीने सोडली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 16:01 IST

दिशा वाकानी या मालिकेत परतणार की नाही यावर चर्चा सुरू असतानाच आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने एक मालिका सोडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचा भाग आहे.

ठळक मुद्देमोनिकाला या मालिकेत काम करण्यासाठी खूपच कमी मानधन मिळत असल्याने ती नाराज होती. तिने मानधन वाढवण्याबाबत मालिकेच्या निर्मात्यांना देखील सांगितले होते. पण मानधन वाढून न मिळाल्याने मोनिकाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. दिशा वाकानी या मालिकेत परतणार की नाही यावर चर्चा सुरू असतानाच आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या मालिकेचा भाग आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना बावरीच्या भूमिकेत मोनिका भदोरियाला पाहायला मिळत आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, मोनिकाला या मालिकेत काम करण्यासाठी खूपच कमी मानधन मिळत असल्याने ती नाराज होती. तिने मानधन वाढवण्याबाबत मालिकेच्या निर्मात्यांना देखील सांगितले होते. निर्माते आणि तिच्यात गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा देखील सुरू होती. पण मानधन वाढून न मिळाल्याने मोनिकाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. 

मोनिकाने या मालिकेचे शेवटचे चित्रीकरण 20 ऑक्टोबरला केले असून आता मालिकेत प्रेक्षकांना तिला पाहायला मिळणार नाहीये. या मालिकेत बावरीने बाघाच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. गलती से मिस्टेक हो गयी हा तिचा या मालिकेतील संवाद चांगलाच गाजला होता. 

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी