Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे बापूजी रिअल लाईफमध्ये आहेत कमालीचे रोमॅन्टिक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 15:34 IST

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अमित धोतर, सदरा आणि चष्मा लावून दिसतो.  पण ख-या आयुष्यात एकदम उलट एक ‘हँडसम मॅन’ आहे.

ठळक मुद्देतुम्हाला कदाचित माहित नसेल पण गुजरात सिनेमात त्याचे मोठे नाव आहे. अनेक गुजराती सिनेमांत त्याने उत्तम भूमिका वठवल्या आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत बापूजींची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अमित भट.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अमित धोतर, सदरा आणि चष्मा लावून दिसतो.  पण ख-या आयुष्यात याच्या एकदम उलट एक ‘हँडसम मॅन’ आहे. अमितचे इन्स्टाग्राम अकाऊंट त्याच्या स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.

अमितचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता, यावर त्याचे फॅमिली फोटो अधिक आहेत. अमित आणि त्याची पत्नी कृती भट यांचे अनेक रोमॅन्टिक फोटो यावर आहेत.अमितला फिरण्याची आवड आहे. शूटींगमधून वेळ मिळाला की, तो कुटुंबासोबत फिरायला निघतो. पत्नी कृती आणि दोन्ही जुळे मुले यांच्यासोबत भन्नात मस्ती करतो.

तारक मेहता का उल्टा चष्मा’ याशिवाय अमितने खिचडी, येस बॉस, चुपके चुपके, गपशप कॉफी शॉप, एफआयआर, फनी फॅमिली डॉट कॉम अशा अनेक मालिकेत काम केले आहे.

सलमान खानच्या प्रॉडक्शन हााऊसच्या एका चित्रपटातही तो दिसला आहे. आयुष शर्मा व वरीना हुसैन स्टारर ‘लवयात्री’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मालिकांसोबत अनेक नाटकांतही तो सक्रिय आहे. बाहर आव तारी बैरी बतावू, गुपचूप गुपचूप, परके पैसा लीला लहर अशा अनेक गुजराती नाटकांत त्याने भूमिका केल्यात. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण गुजरात सिनेमात त्याने मोठे नाव आहे. अनेक गुजराती सिनेमांत त्याने उत्तम भूमिका वठवल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा