Join us

Video: "जावईबापू कुठे आहेत?" विचारताच तापसी गालात हसून लाजली अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:10 IST

लग्नानंतर तापसी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मीडियाने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सर्व हसले

अभिनेत्री तापसी पन्नू ही सर्वांची आवडती. तापसी पन्नूने आजवर विविध सिनेमांमधून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तापसीने काहीच दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बे याच्यासोबत गुपचुप लग्न केलं. तापसी पन्नूच्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली. तापसीला नववधूच्या लूकमध्ये पाहताच मीडियाने तिच्यासोबत चांगलीच हशामस्करी केली. तापसी सुद्धा मीडियाशी गंमतीत संवाद साधताना दिसली. 

तापसीने लाल रंगाची साडी नेसली होती. ती आनंद पंडित यांच्या लेकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आली होती. तापसी जेव्हा लग्नात सहभागी झालेली तेव्हा तिचा चेहरा चांगलाच खुलला होता. लाल रंगाची साडी, लाल बांगड्या, लाल रंगाचीच लिपस्टिक आणि केसात गजरा अशा खास लूकमध्ये तापसी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तापसीला पाहताच उपस्थित मीडियाने, "नवरा कुठे आहे?" "आमचे जावईबापू कुठे आहेत". यावर तापसीने दिलेलं उत्तर फार मजेशीर आहे.

मीडियाने "नवरा कुठे आहे?" असं विचारताच तापसी खुप हसली आणि तिने उत्तर दिलं की, "अरे तुम्ही मार खायला लावाल मला! इकडे आड तिकडे विहिर!" अशा गंमतीशीर शब्दात तापसीने मीडियासोबत हशामस्करी केली.  तापसी आणि मॅथियस यांनी उदयपूरमध्ये काही दिवसांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला मोजकेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

 

टॅग्स :तापसी पन्नूबॉलिवूडलग्न