Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल जोशीचा एथनिक लूक होतोय सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 07:15 IST

आपल्या अभिनयाने अभिनेता स्वप्नील जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

आपल्या अभिनयाने अभिनेता स्वप्नील जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. कृष्णाच्या भूमिकेपासून ते नुकतेच रुपेरी पडद्यावर झळकलेल्या मोगरा फुलला चित्रपटातील भूमिका, प्रत्येकवेळी स्वप्नील रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. लहानथोर आणि विशेषतः. तरुणींचा तो लाडका अभिनेता आहे. स्वप्नील सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतो. काही दिवसांपूर्वी स्वप्निलने त्याच्या ट्रेडिशनल लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत स्वप्निलने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. स्वप्निलच्या फॅन्सना त्याचा हा फोटो पसंतीस उतरला आहे. 

स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशी