Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील बांदोडकरची पत्नी आणि पल्लवी जोशी यांच्यात आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 06:00 IST

पल्लवी जोशी आणि स्वप्निल बांदोडकर यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे.

पल्लवी जोशीचे पती विवेक अग्निहोत्री याचा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती चला हवा येऊ द्याच्या मंचावर आली होती. यावेळी तिच्यासोबत स्वप्नील बांदोडकर आणि चिन्मय मांडलेकर या कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. ‘

पण तुम्हाला माहिती आहे का पल्लवी जोशी आणि स्वप्निल बांदोडकर यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे. स्वप्निल बांदोडकर याची पत्नी संपदा बांदोडकर ही पल्लवी जोशीची मावस बहीण आहे. स्वप्निल प्रमाणे संपदा देखील पार्श्वगायिका आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या संपदा यांनी संगीत शिक्षिका म्हणून अनेक नवख्या कलाकारांना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे.स्वप्नील बांदोडकर प्रमाणे संपदा बांदोडकर यांनी देखील संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

पल्लवी जोशी यांचे संपूर्ण कुटुंबच चंदेरी दुनियेशी निगडित आहे. तिचा  भाऊ मास्टर म्हणजेच अलंकार जोशी हा बॉलिवूड सृष्टीत बालकलाकार म्हणून नावारूपाला आला होता. 'द काश्मीर फाईल्स या आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये आली होती. येत्या ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून काश्मिरमध्ये कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात येणार आहे.  

टॅग्स :पल्लवी जोशीस्वप्निल बांदोडकर