Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपेरी पडद्यावर स्वप्नील आणि गिरीजाची जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 07:16 IST

पडद्यावर कलाकारांच्या नव्या जोड्या पाहणं, त्यांची केमिस्ट्री अनुभवणं प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असते. सिनेमातल्या हिरो-हिरॉइन्सच्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या फ्रेश जोडीची उत्सुकतेनं वाट पाहतात

पडद्यावर कलाकारांच्या नव्या जोड्या पाहणं, त्यांची केमिस्ट्री अनुभवणं प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असते. सिनेमातल्या हिरो-हिरॉइन्सच्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या फ्रेश जोडीची उत्सुकतेनं वाट पाहतात. ‘काय झालं कळंना’ या आगामी मराठी सिनेमातही अशीच एक नवी जोडी जमली आहे. ही जोडी आहे स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू यांची...प्रेम या सुंदर भावनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता या तरुण निर्मात्याने केली आहे. येत्या २० जुलैला ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कॉलेजवयीन तरुणाईची गोष्ट असल्याने आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करणारे फ्रेश चेहेरे या सिनेमासाठी आवश्यक होते, हेच लक्षात ठेवून स्वप्नील आणि गिरीजा यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केल्याचं दिग्दर्शक सुचिता सांगतात.. प्रेमाच्या गुलाबी नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात नवी कोरी जोडी पाहायला मिळणं हे प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचं ठरणार आहे.‘काय झालं कळंना’च्या निमित्ताने प्रथमच कॅमेरा फेस करणारा स्वप्नील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला की, ‘या सिनेमात मी शऱ्या नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. साधा, सरळमार्गी असलेल्या या मुलाचं कुटुंबही तितकंच साधं आहे. पदार्पणातच प्रेमकथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा एक वेगळाच आनंद आहे. या सिनेमात गिरीजाने पल्लवी नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. याबाबत ती म्हणाली की, ‘ही पल्लवी लहानशा गावात राहणारी आहे. शºयाप्रमाणेच साधी आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी आहे. शºयाचं एक सपोर्ट सिस्टीम तिच्या मागे असल्याने थोडी बिनधास्तही आहे. स्वप्नीलसोबत काम करताना खूप मजा आली. आमच्यावर दोन गाणी चित्रीत करण्यात आली आहेत. आमच्यावर चित्रीत करण्यात आलेलं टायटल साँग खूप सुरेख झालं आहे.’ या जोडीसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका यात आहेत. या चित्रपटाची पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी गीतलेखन केलं असून, संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीतं गायली आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत. २० जुलैला ‘काय झालं कळंना’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.