Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:09 IST

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नुकताच जागतिक फादर्स डे सर्वत्र साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लक्ष्मीकांत बेर्डे सिनेमाची रिल चेक करताना दिसत आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. ते फोटोवर कमेंट करून अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

वर्कफ्रंटअभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीने देखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून तिने रंगभूमीवर एन्ट्री केली होती. 'मन येड्यागत झालं' हा मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा सिनेमा १ मार्चला प्रदर्शित झाला. याशिवाय ती रिस्पेक्ट या सिनेमातही झळकली आहे.

  

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेस्वानंदी बेर्डे